कन्यादान

कन्यादान हा क्षण असतो प्रत्येक बाप-लेकीच्या आयुष्यात महत्वाचा
परंतु सुचत नसतं बापाला हा क्षण सुखाचा की
दुःखाचा
लेक माझी झालीये आज मोठी कालपर्यंत जी म्हणत होती बाबा उचलून घ्या ना मला तुमच्या पाठी
मरतोय तो बाप मनातल्या मनी जसजशी परक्यां कडे जाण्याची वेळ येते जवळी
ज्या मुलीला जपलं तळ हाताच्या फोडा सारखा जपतील का सासरचे तिला एखाद्या मोत्या सारखा ?
लेक सासरी जाणार हया विचाराने लागतो जिवाला घोर आनंदाने सासरी राहणार की नाही ही माझी लाडाची पोर ?
सौंसाराची सुरूवात होण्याआधी आला मनात एकच विचार करेल का नवरा सुद्धा बाबांसारखा माझा विचार?
सौंसाराची गाडी जेव्हा आली रुळावर तेव्हाच जाणवलं बापचं असतो जो करतो निरपेक्षित प्रेम
ज्या चिऊ ला यायचं बापाच्या ओरडण्याने रडू आज नवर्‍याचा मार खाऊन मात्रं ठेवते ति चेहऱ्यावर खोटे हसू
झाली आहे का ति लेक इतकी परकी के सांगता येत नाहीये तिला तिच्या मनातल्या झूरती …
बाबांना कळले मुलीच्या मनातली व्यथा बाबा रागवून म्हणाले का नाही सांगितलं तू मला तुझ्या मनातली गाथा
घेऊनी डोळ्यात अश्रूंचा कहर बाबा म्हणाले झाली आहेस तू माझ्यावर भार असा आणू हि नको मनात विचार
शेवटी बाबांचा मिठीत जाउनी विसरून सगळा त्रास जाणवले की बापाचे प्रेमच असते अपरंपार .

  • सलोनी गौडा
5 Likes